अमरावती जिल्हा नकाशा

नाव अमरावतीAmravati.ogg उच्चारण (सहाय्य·माहिती) हे शहर अमरावती जिल्हा तसेच अमरावती विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. अमरावती या शब्दाचा अर्थ पुराणातील देव [[इंद्र] याची नगरी / राजधानी असा होतो. या शहरात जुन्या काळी उंबराचे झाडे खूप होती म्हणून या शहराला उमरावती असेही म्हटले जाते. अमरावती याच नावाचे एक गाव आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात आहे. इतिहास अमरावतीचे पुरातन नाव औदुंबरवती होते, ते प्राकृतमध्ये उंबरावती होते. याचाच अपभ्रंश अमरावती असा झाला. कदाचित हे नाव येथील प्राचीन अंबादेवी मंदिरावरून पडले असावे. जुनी अमरावती येथील भगवान आदिनाथ ऋषभनाथ यांच्या संगमवरी मूर्तीच्या पायथ्याशी असलेल्या शीलालेखावर अमरावती यानावाचा पहिल्यांदा उल्लेख आढळतो. या मुर्ती इ.स. १०९७ मधील आहेत. गोविंद महाप्रभू यांनी १३व्या शतकात अमरावतीला भेट दिली होती. १४ व्या शतकात दुष्काळ व अवर्षणामुळे अमरावतीमधील लोक माळवा व गुजरातमध्ये स्थलांतरित झाले होते रावबहादूर रघुनाथ नरसिंह मुधोळकर, दादासाहेब खापर्डे, मोरोपंत विश्वासनाथ जोशी असे अनेक भारतीय स्वातंत्र्यसेनानी अमरावतीचे होते. भूगोल हवामान अमरावतीचे हवामान हे उन्हाळ्यात गरम व कोरडे आहे. येथील हिवाळा थंड व कोरडा आहे. येथे उन्हाळा मार्च ते जून, पावसाळा जुलैपासून ऑक्टोबरपर्यंत , आणि त्यानंतर मार्चपर्यंत हिवाळा असतो. सर्वाधिक तापमान २५ मे १९५४ रोजी ४६.७° सेल्शियस असे होते आणि आणि सर्वात कमी तापमान ९ फेब्रुवारी इ.स. १८८७रोजी ५.०° सेल्शियस इतके होते.
download